अर्थव्यवस्थेवरचं सरकारी नियंत्रण कमी करण्याचा युक्तिवाद वाचल्यावर एका दिवसात नरसिंह राव यांची भूमिका बदलली…
राव पंतप्रधान झाल्यानंतर दोन आठवड्यांनी मुंबईतल्या रिझर्व बँकेतून वाहनांचा ताफा बाहेर पडला. या गाड्यांमधून २१ टन शुद्ध सोनं ३५ किलोमीटर्सवरच्या सहार विमानतळाकडे वाहून नेलं जात होतं. सोनं विमानानं लंडनला नेण्यात आलं, तिथं ‘बँक ऑफ इंग्लंड’च्या तिजोरीत ठेवण्यात आलं. या बदल्यात नरसिंह राव यांच्या सरकारला डॉलर मिळाले, त्यातून देशावरील कर्जाचे चुकलेले हप्ते फेडण्यात आले.......